डीएनसी समाजकार्य महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत भोसले यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट उलगडून सांगताना आपल्या समाजामध्ये बरेच समाज सुधारक हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. अशा सर्वच शिक्षण प्रेमींचा आज सन्मान दिवस म्हणून शिक्षक दिन हा साजरा केला जात आहे. यामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे त्यांनी कुलगुरू असतांनाच त्यांच्या १० वर्षांतील कार्यकाळात त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून भरीव असे कार्य केलेले आहे. त्यानंतर सोवियत संघात भारताचे राजदूत म्हणून ०४ वर्ष कामकाज बघितले.

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती १० वर्ष आणि दुसरे राष्ट्रपती ०५ वर्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या अभुतपुर्व कार्यामुळेच व योगदानामुळे आपल्या उभय शिक्षण व्यवस्थेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून समाज बदलाचे माध्यम म्हणून बघितले जाऊ लागले. अशा या शिक्षकांचा सन्मान दिवसाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.