मुलगी घरी आली नाही; मात्र तिची चप्पल, ओढणी विहिरीजवळ आढळली…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सध्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. राज्यात कित्येक मुली या दिवसा ढवळ्या बेपत्ता होण्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसत आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील वडगांव ता. रावेर येथिल १८ वर्षीय विद्यार्थिनीचे दप्तर,चप्पल व ओढणी रावेरपासुन दिड किलोमीटर अंतरावरील अजंदा रस्त्यावरील विहीरीजवळ मिळून आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. सदरील विद्यार्थिनीचा विहीरीत व आजुबाजूच्या शेतात शोध घेतला मात्र कोठेही मिळून आली नाही, यानंतर रात्रीचा अंधार पडल्याने पोलीसांनी शोध मोहीम थांबवली आहे.

येथिल शितल मुकेश वाघोदे नावाची विद्यार्थिनी स्वामी समर्थ महीला महाविद्यालय रावेर येथे शिक्षण घेते. बुधवारी सकाळी ती कॉलेजला जात असल्याचे सांगुन घराबाहेर पडली. दुपारी रावेर विश्रामगृहाच्या मागील अजंदा रस्त्यावरील विहीरीजवळ तिची चप्पल, दप्तर, ओढणी आढळून आल्याने खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक कैलास नागरे,सहा. पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगांवकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी असलेल्या विहीरीत दोन जण उतरुन शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही मिळून आले नाही. रात्री अंधार पडल्याने पोलीसांनी शोध मोहीम थांबवली. गुरुवारी सकाळी तिचा शोध घेतला जाणार आहे. याबाबत विद्यार्थिनीच्या पालकाने निंभोरा पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.