देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर अजून ‘एका’ नेत्याचा गौप्यस्फोट…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धक्कादायक खुलासे केले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमच्यासोबत डबल गेम केला. असा आरोप त्यांनी केला. सोबतच उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचे सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार होती. पण शरद पवार यांनी चार दिवस आधी मागे फिरले. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. त्यात आता भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नवा दावा केला आहे. शरद पवारांनी आम्हला धोका दिला आहे. यात काहीही खोटं नाही आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. शरद पवारांनी पालकमंत्री आणि जिल्हे वाटप सुद्धा केले होते. त्यांनतर त्यांनी माघार घेतली. देवेंद्र फडणवीसयांनी जे मुलाखतीत सांगितले ते शंभर टक्के खरं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.