भारत जोडो अभियानाचे जळगावात १ व २ जुलैला कार्यकर्ता संमेलन

0

ईव्हीएमला नकार , बॅलेटचा स्वीकारने होणार अनोखे उदघाटन

जळगाव ;– येत्या १ व २ जुलै रोजी जळगाव शहरात गोदावरी इंजिनिअरीं कॉलेज जवळ महाराष्ट्र जोडो भारत जोडो अंतर्गत १३३ गैर राजकीय संघटनांचे राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन होणार असून ईव्हीएमला नकार आणि बॅलेटचा स्वीकार या संकल्पनेनुसार मान्यवरांच्याहस्ते मतदान करण्यात येऊन अनोख्या पद्धतीने या संमेलनाचे उदघाटन होणार आहे. तसेच यावेळी कष्टकरी कामगारांना न्याय मिळत नसल्याने नांगर,घमेली आणि फावडे हे सांकेतिक स्वरूपात सादर करून या संमेलनाला प१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली .

याप्रसंगी प्रतिभा शिंदे , जयसिँगराव वाघ, मिलिंद बागुल आदी उपस्थित होते . यावेळी माहिती देताना जयसिंगराव वाघ यांनी ईव्हीएमद्वारे मतमोजणीला सर्वत्र विरोध होत असून सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात दाखले दिले आहेत. तसेच जनसामान्यांची पूर्वीप्रमाणेच बॅलेटद्वारे मतदान घेण्यात यावे अशी मागणी असल्याने ईव्हीएमला नकार आणि बॅलेटचा स्वीकार या अनोख्या पद्धतीने हे उदघाटन होणार असल्याची माहिती दिली .

स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी लेखक,पत्रकार, सामाजिक संघटना, विविध पुरोगामी व परिवर्तनवादी संघटना , सुजाण नागरिक , सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार असून यात अनेकांचे मार्गर्दर्शनपर सत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. संमेलनाला माजी न्यायमूर्ती बीजे कोळसे पाटील , निरंजन टकले,निखिल वागले, मेधा पाटकर , श्रीमंत कोकाटे , सुनील तांबे , सुभाष वारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यकर्ता संमेलनासाठी विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत .

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.