धक्कादायक; विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दिपनगर जवळील कपील वस्तीत घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकात असताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि २९ गुरुवार रोजी सकाळी घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव पासून जवळ असलेल्या व पोलीस स्टेशन हद्दीतील कपील वस्ती परिसरातील रहिवाशी अरविंद मधुकर बाविस्कर (२०) हा तरुण पावसाळा सुरू झाल्याने घर गळतीमुळे आपल्या राहत्या घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकण्याचे काम करीत होता. यादरम्यान पत्रा खाली ठेवलेला लोखंडी पाईप बाहेर काढताना घरा शेजारून जाणाऱ्या विजेच्या तराला पाईपाचा स्पर्श झाला. यावेळी त्याला जबर धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडताच शेजारील नागरिकांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ क्षितिजा हेडवे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला रमेश मोतीराम चव्हाण यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.