धक्कादायक; १५ वर्षीय मुलाने केला ७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार…

0

 

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्रात रोज कुठून ना कुठून एक तरी अत्याचार बलात्काराची बातमी येऊन धडकत आहेत. गेल्याचा आठवड्यात जळगाव जिल्ह्यात एका १९ वर्षीय नराधमाने ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेचे पडसाद सर्व राज्यभरात उमटत आहेत. अश्यातच हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. तेथे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईच्या मुलाने हे दुष्कृत्य केले. त्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी या अल्पवयीन आरोपी विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडली.

या मुलाने 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच लगेच पोलीस स्थानकात धाव घेण्यात आली. यानंतर रात्रीच आरोपी मुलाला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळमनुरीचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.