पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ठार मारण्याचा प्रयत्न

0

पारोळा ;- तालुक्यातील एका गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचालयाला गेली असता एकाने तिला अडवून तिच्यावर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १० रोजी उघडकीस आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तालुक्यात एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलगी हि १० रोजी सायंकाळी शौचालयाला जात असताना आरोपी बारक्या उर्फ अशोक मगा भिल (मोरे ) पारोळा जि जळगाव याने तिला अडवून तिच्यावर जबरदस्ती करून तिने विरोध केला असता आरोपीने तिचा दोरीने गेला आवळून आणि डोक्यावर दगडाने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली . तिला उपचारासाठी तिच्या भावाने धुळे येथे दाखल केले असून पीडितेवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने पारोळा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी बारक्या उर्फ अशोक मगा भिल (मोरे ) याच्याविरुद्ध ३०७,३७६(३) , ३५४,३२३,व बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलाम ४,८,१०,१२ प्रमाणे पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस सहाय्य्क फौजदार सुनील पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.