‘ड्रीम गर्ल २’च्या मेकर्सवर चक्क स्टोरी चोरी करण्याचा आरोप !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या आयुष्मान खुराणा याचा ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) हा चित्रपट सध्या चर्चेत असून विशेष म्हणजे या चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार केले जात आहे. ड्रीम गर्ल या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. ड्रीम गर्ल २ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ड्रीम गर्ल २ चित्रपटातील एक गाणे देखील सद्या रिलीज करण्यात आले आहे. जेव्हा चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

ड्रीम गर्ल २ मध्ये ‘आयुष्मान खुराना’ (Ayushmann Khurrana) याच्यासोबत ‘अनन्या पांडे’ (Ananya Pandey) मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. टिझर पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची जास्तच उत्सुकता लागली आहे. पण आता या चित्रपटाच्या मेकर्सवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. ड्रीम गर्ल २ चित्रपटाचा लेखक आणि निर्देशक असलेल्या राज शांडिल्यवर (Raj Shandilya) अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहे. राज शांडिल्य यांच्यावर चक्क चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा गंभीर आरोप राज शांडिल्यवर लावण्यात आला आहे. इतकेच नाहीत तर, ही पहिली वेळ नाही की, राज शांडिल्यवर चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा आरोप केला गेला होता.

झाँसी येथील रहिवासी असलेले अंकुश शर्माने हा आरोप केला आहे. विशेष म्हणजे अंकुश शर्मा हे राज शांडिल्य याचे जुने मित्र आहे. अंकुश शर्मा म्हणाले की, मी राज शांडिल्यला ‘लव की अरेंज मॅरिज’ या चित्रपटाची स्टोरी ईमेल केली होती. मी चित्रपटाची स्टोरी लिहिली असताना त्यांनी कुठल्याच गोष्टीची कल्पना न देता या चित्रपटावर काम सुरू केले आहे. आणि माझी स्टोरी चोरी केली. यावर राज शांडिल्य म्हणाले की, मुळात म्हणजे हे सर्व प्रकरण जुने आहे. इतकेच नाही तर, हे प्रकरण कोर्टात देखील सुरु आहे. मी यावर जास्त काहीच सांगू शकणार नाही. या संदर्भात कोर्टाचा निकाल लवकरच लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.