आदिवासी टोकरे कोळी जामतींवरील अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समितीने

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रांती दिनानिमित्त जळगाव निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना आदिवासी टोकरे कोळी जमातींच्या मागण्यांचे निवेदन दिले. राज्यातील १ कोटी ३० लाख आदिवासी अनुसूचित जमाती पैकी १ कोटी आदिवासींवर घटनादत्त सोई सवलतींबाबत अन्याय होत आहे. या १ कोटी आदिवासींच्या संख्येवर राज्य व केंद्र सरकारचा निधी मिळतो मतदार संघ अनुसूचित जमाती करीता राखीव होतात विकास योजना आखल्या जातात परंतु त्यांना अनुसूचित जमाती चे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र नाकारले जातात व अनुसूचित जमाती च्या या ४५ पैकी ३५ ते ४० अनुसूचित जमाती चे घटनादत्त अधिकार नाकारले जातात. राज्य भरात अनेक आंदोलनाद्वारे ही बाब राज्य शासनाच्या लक्षात आणून देवूनही शासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही.

म्हणून शासन व प्रशासनाच्या आदिवासी विभागच्या घटनाबाह्य कॄतीचा माजी मंत्री डॉ दशरथ भांडे यांच्या मार्गदर्शनाने राज्यभर आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती जाहीर निषेध करीत आहे. या अनुषंघाने अन्यायग्रस्त आदिवासी जमातींना न्याय मिळावा यासाठी आदिवासी कोळी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे राज्य संघटक प्रशांत तराळे यांच्या सुचनेने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव मनपा माजी उपमहापौर आदिवासी नेते डॉ. अश्विन भाऊ सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ ऑगस्ट या आदिवासी दिन व क्रांती दिनी जळगाव जिल्हयातील टोकरे कोळी बांधवांना आदिवासी विभाग व जात पडताळणी समितीकडून हेतुपुरस्सर अन्याय केला जात आहे. याबाबत ब्रिटिश कालीन नोंदी ग्राह्य धरुन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन आज आदिवासी कोळी महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

यावेळी डॉ अश्विन सोनवणे यांनी आपल्या प्रश्नांची शासनाने दखल घावी यासाठी मुख्यमंत्री महोदय व माननिय उपमुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ मंत्रालयात बैठक आयोजित करावी यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीष भाऊ महाजन यांची भेट घेणार असल्याचे, उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी प्रल्हाद सोनवणे यांनी आदिवासी टोकरे कोळी जमातींवरील अन्याय दूर करावा अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा दिला ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिना निमित्त रामायण कार आद्यकवी महर्षि वाल्मीकी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा क्रांतीवीर राघोजी भांगरे व इतर आदिवासी महा पुरुषांना अभिवादन करण्यात आले. निवेदन देतेवेळी माजी उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे, आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग रविन्द्र शेठ नन्नवरे, जळगाव महानगर अध्यक्ष किशोर बाविस्कर, जिल्हा मार्गदर्शक गंभीरराव उन्हाळे कर्मचारी कोषाध्यक्ष सुरेश नन्नवरे, उपाध्यक्ष दत्तू कांडेळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शैलेन्द्र सोनवणे, महिला अध्यक्षा शोभा कोळी, उपाध्यक्षा स्नेहा सोनवणे, सुधा काबरा, शुभांगी बिल्हाडे, संध्या तायडे, महानगर सचिव अनिल सपकाळे, उपाध्यक्ष दिपक कोळी, सहसचिव युवराज सपकाळे, अरूण सोनवणे, प्रदीप सोनवणे, विठ्ठल तायडे, कैलाश बाविस्कर, तालूका अध्यक्ष ललित कोळी, उपाध्यक्ष गोकुल कोळी, सहसचिव राजेंद्र कोळी, सहसचिव अशोक सपकाळे यांच्या सहआदिवासी कोळी महासंघ पदाधिकारी व कोळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.