जळगाव ग्रामीण मधील पर्यंटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी ६ कोटींचा निधीस मान्यता !

0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा रिधुर श्री अवचित हनुमान मंदिराचाही समावेश

जळगाव;- पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाविक भक्तांचे व पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या जळगाव तालुक्यातील रिधुर येथील प्राचीन अवचित हनुमान मंदिर , पळसोद येथिल पुरातन व प्राचीन महादेव मंदिर व धरणगाव तालुक्यातील वाघळू द येथिल श्री विठ्ठल मंदिर या तीर्थस्थळांच्या व पर्यटन स्थळांच्या पायाभूत विकासासाठी पर्यटन वृद्धी व्हावी, स्थानिकांना लहान मोठा रोजगार उपलब्ध व्हावा तसेच भावी भक्तांसाठी सुख सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पर्यटन अंतर्गत ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाविक भक्तांच्या आनंदात भर पडली असून येथील भावी भक्तांनी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. सदर ठिकाणी पर्यटनास मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे.

या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर !

जळगाव तालुक्यातील रिधुर येथील पुरातन व जागृत अवचित हनुमान मंदिराचे पर्यटन विकास योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा व विकास करणे – २ कोटी , पडतो येथील पुरातन रामेश्वर महादेव मंदिर परिसरात चा विकास करणे – २ कोटी आणि धरणगाव तालुक्यातील वाघळूद बु. येथील पुरातन श्री. विठ्ठल मंदिर येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत विकास करणे – २ कोटी असे एकूण शासनाच्या पर्यटन विभागामार्फत जळगाव ग्रामीणसाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ८० लक्ष निधी प्राप्त झाला आहे. पर्यटन योजनेंतर्गत गावातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत पोहोच रस्ते, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह, शौचालय, वाहनतळ, भक्तनिवास, पोहोच रस्त्यावरील पथदिवे आणि संरक्षक भिंत, सुशोभीकरण इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री गिरिषजी महाजन यांचे आभार व्यक्त केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.