डांभूर्णीतील १७ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय…  

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

यावल तालुक्यातील तालुक्यातील डांभुर्णी गावात एका युवकाने आत्महत्या केल्ची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मुकेश नरसिंग बारेला (१७), रा. डांभूर्णी ता.यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश नरसिंग बारेला या युवकाने खळ्यात आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेवून त्यास यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत मयत अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.