दोन रिक्षाचालकांचा महिलेवर रस्त्यात अतिप्रसंग; मात्र घडला मोठा चमत्कार.. आणि…

0

 

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यात अनेक महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहरं महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे. महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना येथून वारंवार समोर येत आहेत. आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं आहे की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरातून गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. पण रिक्षा चालकाने आणि पाठी बसलेल्या त्याचा साथीदार यांनी आपापसात संगनमत करुन एका निर्जनस्थळी नेलं. आरोपींनी रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला निवस्त्र करत अतिप्रसंग करण्यास सुरूवात केला. मात्र याच वेळी एक चमत्कार घडला.

रात्री गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अतुल भोई आणि सुधीर हासे सुदैवाने तिथे आले. यावेळी रिक्षामध्ये दोन इसम एका महिलेला रिक्षात बसून तिच्यासोबत अतिप्रसंग करत यासल्याचा संशय आल्याने त्यांनी मोटारसायकलने रिक्षाच्या दिशेने फिरवली. यावेळी आरोपींनी रिक्षा पळवली. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे, असे लक्षात आल्याने त्यांनी महिलेला चालत्या रिक्षातून खाली ढकलून दिलं. त्यानंतर आरोपींनी फरार होण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे या दोन्ही रिक्षा चालकांची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांनी पोलिसांकडून वाचण्यासाठी पोलिसांवर शस्त्राचा हल्ला केला. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय. सध्या मानपाडा पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय.

प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे या दोन्ही नराधमाचे नाव आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांना पकडून महिलेच्या जीव आणि आब्रू वाचवणारे धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांचे सुधीर हसे आणि अतुल भोई अशी नावे आहेत. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं जात आहे.

आरोपींवर विनयभंगसह इतर कलमातंर्गत गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी अजून किती ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य केले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र रिक्षा चालकाच्या या घटनेनंतर डोंबिवली परिसरामध्ये रात्री प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.