उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थिती देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार..!

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव येथे १०सप्टेंबर २०२३ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन शिवसेनेची ताकद दाखवावी असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी येथे शुक्रवारी झालेल्या तालुका शिवसैनिकांच्या मेळाव्याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलतांना केले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने एकमुखी प्रतिसाद देत तालुक्यातून मोठ्या संख्येने जळगाव येथे उपस्थिती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या मेळाव्याप्रसंगी जवळपास शंभर पेक्षा अधिक ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुका व शहरातील शिवसेना, युवासेना, महीला आघाडी, शेतकरी सेना, व्यापारी सेना या पदाधिकऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या व नवनियुक्त पदाधिकऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. याशिवाय तालुक्यातील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधुन त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कुणाल महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल भावसार यांनी केले.

मेळाव्याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत,जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरध्यक्ष शरद तायडे, राजेंद्र पाटील, जि.प मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, मा.जि.प.सदस्य नाना महाजन, रमेश महाजन, मा. नगराध्यक्ष दशरथ महाजन, निलेश चौधरी, रुपेश माळी, प्रमोद महाजन, प्रसाद दंडवते, अनिल महाजन, रेवानंद ठाकूर, राजू भेलसेकर, सुरेश पाटील(फरकांडे), संजय पाटील (निपाणे), अरुण साळी, सुनिल मानुधने, कैलास भाटिया, सुरेश खुरे, भिका वाणी, समाधान चौधरी, पांडुरंग बाविस्कर, परेश बिर्ला, कल्पना महाजन, आरती महाजन, शेवंताबाई पाटील, राजू ठाकूर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

संजय सावंत यांनी शिंदे सरकार वर हल्लाबोल करत ‘शासन आपल्या दारी,कार्यक्रमासाठी प्रत्येक कार्यक्रमासाठी २कोटी १३लाख रूपये खर्च होतो. हा पैसा जर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरला असता तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी ची सोनेरी पहाट उजाडली असती असे प्रतिपादन करण्यात आले.

यावेळी गुलाबराव वाघ,हर्षल माने,नाना भाऊ महाजन, अतुल महाजन,सुरेश पाटील(फरकांडे),संजय पाटील (निपाणे) यांची समयोचीत भाषणे झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.