वरणगाव व फुलगाव येथे घरफोड्या…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

वरणगाव शहरातील रेणुका नगर परिसर व फुलगाव येथील घर मालक बाहेरगावी गेल्याने बंद घराचे कुलूप कटरने तोडत अज्ञात चोरांनी डाव साधून मंदिराच्या दान पेटीवर हात साफ केल्याची घटना शनिवारच्या रात्री तीन वाजेच्या सुमारास घडली.

या बाबत सविस्तर वृत असे की, शहरातील रेणुका नगर परिसरातील चार घराचे मालक घर बंद करून बाहेर गावी गेले असल्याचे पाहून, अज्ञात चोरट्यांनी घराला कुलूप लावलेल्या घराचे कटरने कुलूप तोडून हात साफ केला. तर फुलगाव येथेही असाच प्रकार सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली. सदर चोरी बाबत सविस्तर तपशील समजू शकला नाही. कारण पाचही घर मालक बाहेरगावी गेल्याने अद्याप वरणगाव पोलीस स्टेशनला कुठल्याच प्रकारची नोंद झालेली नाही. मात्र घटनेची माहिती मिळताच स.पो.नि. आशिष आडसुळ, उप निरिक्षक परशुराम दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत, चोरीत किती ऐवज व रोख रक्कम गेली हे घरमालक आल्या नतंरच उलगडा होणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.