अमित शहांच्या पुणे दौऱ्यात मोठा बदल, तात्काळ गाठणार दिल्ली

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काल संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्याचा दोन दिवसांचा पुणे दौरा आयोजित करण्यात आला होता. शनिवारी आणि रविवारी संपूर्ण दिवस अमित शहा यांचा मुक्काम पुणे शहरात होता. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तब्बल ४ तासांची राखीव वेळ ठेवली होती. मात्र, त्यांच्या दौऱ्यामध्ये तातडीने मोठा बदल करण्यात आला आहे. चिंचवडचा (Chinchwad) कार्यक्रम आटोपल्यावर ते थेट दिल्लीला (Delhi) रवाना होणार असल्याचे समजत आहे.

अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे उदघाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टिपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी राखीव वेळ ठेवला होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. त्याठिकाणी बैठक होणार होत्या. त्या बैठका अमित शाह यांनी रद्द केल्या आहे. आता अमित शहा ३ वाजता पुणे विमानतळावरूनच थेट दिल्लीला रवाना होणार आहे.

अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हजर राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.