पुढील दोन आठवडे पाऊस घेणार विश्रांती ; हवामान विभागाचा अंदाज

0

 

मुंबई ;- गेल्या महिन्यात राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात बारसल्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर, पुढील दोन आठवडेही पावसाची विश्रांती राहणार आहे. हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या राज्यांत पावसाची स्थिती

गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर पुढील दोन आठवडे पाऊस विश्रांती घेणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. पण राज्यातील इतर भागात मात्र पावसाची स्थिती नसणार आहे, असं अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

शेतीच्या कामांना वेग येणार

सलगच्या होणाऱ्या पावसानंतर राज्यातील पुढील दोन आठवडे कोरडे वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. यामुळे शेतीला पूरक कामे करून घेण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळणार आहे. राज्यात १ जूनपासून सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.