साखळी बॉम्ब स्फोटची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबई ;– मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी देणारा पोलिसांना कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने हा कॉल आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे

मुंबईत – लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. जुहू पोलिसांनी गांभीर्याने तपास करत धमकीचा कॉल करणाऱ्या फोन करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या संपूर्ण चौकशीनंतर सत्य समोर येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.