मलकापूर येथील न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

अल्पवयीन पिडीतेवर बलात्कार प्रकरणी आरोपीस वीस वर्षाची शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अल्पवयीन पिडीतेवर बलात्कार प्रकरणात आरोपीस वीस वर्षाची शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा मलकापूर येथील वि.तदर्थ तथा विशेष न्यायाधीश एस.व्हि.जाधव यांनी आज दि. 05 ऑगस्ट रोजी सुनावली आहे.

सविस्तर घटना अशी, की पिडीता ही घटनेच्या दिवशी दुपारी तीन वाजता शौचास गेली होती. परत येत असताना आरोपी सारंगधर उर्फ साऱ्या प्रभाकर कहाते रा.हरसोडा याने पिडीतेचा जबरदस्ती हात धरून पिडीतेला घरात ओढत नेत दरवाजा बंद करून धमकाविले व त्यानंतर पिडीतेवर बलात्कार केला. त्यानंतर पिडीता हिने दसरखेड एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुध्द अ.प.क्र.187/21 कलम 376(3), 363, 368, 354(अ), 354(ब), भादवी सह कलम 4(2), व 8 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पो.उप.नि.राहुल प्रशांत बोरकर यांनी केला. तपासांती मा.दतर्थ तथा विशेष न्यायाधीश (पोस्को कोर्ट) मलकापूर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले व स्पेशल पोस्को केस नं.65/2021नुसार खटला आरोपी विरुद्ध चालवण्यात आला.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीति, तसेच पिडीतेची मामी, मामेबहीण व डॉक्टर तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे झालेल्या साक्षीपुराव्यावरुन व सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश हरिहर जोशी यांचा प्रभावी युक्तिवाद विद्यमान न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी विरुद्ध दाखल सर्व कलमांमध्ये आरोपी सारंगधर उर्फ साऱ्या प्रभाकर कहाते याला दोषी ठरविण्यात आले. आरोपीस कलम 376 (3), भादवी कलम 4(2), पोस्को कायद्यानुसार विस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 50 हजार रुपये व दंड न भरल्यास दोन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच वरील दंड आरोपीने भरल्यानंतर ती रक्कम पिडीतेल देण्याचा आदेश केला आहे.

तसेच पोस्को कायद्यान्वये कलम 8 नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 354 अ भादवी नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड न भरल्यास तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 354 ब नुसार तीन वर्षे सक्षम कारावास व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्याची सश्रम कारवासाची शिक्षा, कलम 363 भादवीनुसार तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्या तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा, कलम 368 भादवी नुसार तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम वर कलमा अंतर्गत एकत्रित दंड 15000 रुपये हा सुद्धा आरोपीने भरल्यानंतर पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना शिफारस पाठवून पिडीतेस वाढीव नुकसान भरपाई रक्कम ठरवून देण्यात यावी असे सुद्धा निकालात नमूद केले आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियंता शैलेश हरिहर जोशी तसेच तपास अधिकारी पो.उप.नि राहुल प्रशांत बोरकर व भैरवी अधिकारी ऐ.एस.आय संतोष गुलाबसिंग ठाकूर ब.नं 14 12 , ऐ.एस.आय प्रभाकर भगवान काळे ब.नं 256 यांनी काम पाहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.