चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर चांद्रयान-३ ने इस्रोला पाठवला खास संदेश !

0

नवी दिल्ली ;- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने अलीकडेच चंद्र मोहीमेचा भाग म्हणून चांद्रयान-३ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. चांद्रयान-३ ने आता पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचं अंतर व्यापलं असून चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) याबाबतची पुष्टी केली आहे.

काल सायंकाळी सातच्या सुमारास चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे. दरम्यान चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत पोहोचताच त्याने इस्त्रोला खास मेसेज पाठवला. “MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling iunar gravity.” असा संदेश यानाने पाठवला. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (mox), ISTRAC, बंगळुरू, हे चांद्रयान-३ आहे. मला चंद्रावर गुरुत्वाकर्षण जाणवत आहे. असं या संदेशात म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.