नाशिकचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

तहसीलदाराच्या घरी सापडली ४ लाख ८० हजार रोकड व ४० तोळे सोने सापडले

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्ह्यात एका तहसीलदाराला एसीबी (ACB) अधिकाऱ्यांना १५ लाखांची लाज घेताना ताब्यात घेतलं आहे. त्या तहसीलदाराचं नाव नरेशकुमार बहिरम असं आहे. काल रात्री एसीबीच्या पथकाने तहसिलदारांच्या घराजवळ ही कारवाई केली. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तहसीलदारांना लाच मागितली असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांना सांगितली. ज्यावेळी तहसीलदारांच्या घराजवळ ही कारवाई केली. ज्यावेळी तहसीलदारांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाहणी केली असता, त्यावेळी त्यांच्या ४ लाख ८० हजार रोकड आणि ४० तोळे सोने सापडले. एसीबीच्या पथकाने काल रात्री तहसीलदारांना ताब्यात घेतलं आहे. एसीबीच्या पथकाने काल रात्री तहसीलदारांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधकविभागाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना १५ लाखांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडून काल रात्री अटक केली. नाशिक शहरातील बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थानाजवळ लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. गौण खनिज प्रकरणातील प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी लाच मागितली होती.

एसीबीच्या पथकाने रतरी उशिरा बहिरम यांना ताब्यात घेतल्यानंतर घराची झडती घेतली असता, तहसीलदारांच्या घरी ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि ४० तोळे सोने आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. नरेश बहिरम यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.