गरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक फायदेशीर -अमित शहा

0

पिंपरी चिंचवड ;– सहकारातून समृद्धी या तत्वानुसार नरेंद्र मोदी यांनी देशभर सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचे काम केले जात आहे. गरीब व्यक्तीच्या मनात जे उद्देश होते, ते पूर्ण करण्याचे काम मोदी यांनी नऊ वर्षात केले. गरिबांना घर, घरात शुद्ध पाणी, सिलेंडर, शौचालय, विमा, मोफत अन्न आणि वीज देण्याचे काम मोदी यांनी केले. सर्वसामान्य नागरिक ज्या मुलभूत गोष्टींसाठी दररोज काम करत होते, ते काम मोदी यांनी केले. राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचे स्वप्न गरीब नागरिक बघू लागला आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक फायदेशीर आहे, असे मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.

केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शहा बोलत होते. देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले.
या विभागाचे पहिले मंत्री म्हणून अमित शहा काम पाहत आहेत. देशातील सहकार विभागाला एका ठिकाणी आणण्यासाठी डिजिटल पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृह, सहकारिता मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, “महाराष्ट्रातून सहकाराचे संस्कार देशभर पसरले आहेत. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आदींनी सहकाराला बळकट केले. यालाच आदर्श मानून देशातील सहकार आंदोलन पुढे गेले.सहकार मंत्रालयाचा संपूर्ण कारभार डिजिटल होत आहे. सहकाराशी संबंधित कोणत्याही कामासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या कार्यालयात बसून सहकाराशी संबंधित सर्व बाबी आपण करू शकतो.

सहकारातून समृद्धी या तत्वानुसार नरेंद्र मोदी यांनी देशभर सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचे काम केले जात आहे. गरीब व्यक्तीच्या मनात जे उद्देश होते, ते पूर्ण करण्याचे काम मोदी यांनी नऊ वर्षात केले.गरिबांना घर, घरात शुद्ध पाणी, सिलेंडर, शौचालय, विमा, मोफत अन्न आणि वीज देण्याचे काम मोदी यांनी केले. सर्वसामान्य नागरिक ज्या मुलभूत गोष्टींसाठी दररोज काम करत होते, ते काम मोदी यांनी केले असल्याचे शहा यांनी सांगितले.

शहा पुढे म्हणाले, ‘राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचे स्वप्न गरीब नागरिक बघू लागला आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक फायदेशीर आहे.
देशातील 1555 कोऑपरेटीव्ह सोसायट्यापैकी 42 टक्के सोसायटी एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या पोर्टलचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला सर्वाधिक होणार आहे.

राज्याची सहकार कार्यालये देखील संगणकीकृत केली जातील. सहकारिता आंदोलन पारदर्शकतेशिवाय पुढे जाणार नाही. पारदर्शक व्यवस्था समाजाच्या 60 कोटी लोकांना जोडेल.

इफ्को, क्रिप्टो, नाफेड, अमूल दुध हे सहकाराच्या जोरावर एवढे मोठे झाले आहेत. मल्टी स्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटी कायद्यात संशोधन करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक चांगल्या बाबी जोडल्या गेल्या आहेत. नव्या सुधारणेनुसार सहकारी क्षेत्रात बशिलेबाजीला कोणतेही स्थान नसेल. गुणवत्तेनुसार नेमणूक केली जाईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सहकार विभागाचे स्टोरेज केंद्र सुरु केले जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.