मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत किमान ७ जागांसाठी आग्रही आहे. बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, नाशिक, परभणी या जागांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, लोकसभा जागावाटप आणि पक्षाच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता पुण्यात राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांसह आमदार, खासदारांची बैठक बोलावली आहे.
भाजपने राज्यातील आपल्या कोट्यातील २३ जागांवरील लोकसभेचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. मात्र शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीतील मित्रपक्षांकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील उर्वरित २५ जागांवरील उमेदवारजाहीर होणे बाकी आहे. त्यासाठी महायुतीतील
पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची रविवारी बैठक पार पडली. यात अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.