नवी दिल्ली : – काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुप्रिया श्रीनेट आणि एचएस अहिर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजपा आक्रमक झाला असून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून श्रीनेत आणि अहिर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाने यासंदर्भात एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली आहे. सुप्रिया श्रीनेत यांच्या लाजिरवाण्या वर्तनामुळे राष्ट्रीय महिला आयोगाला धक्का बसला आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर कंगना रणौतबद्दल असभ्य आणि अपमानजनक कमेंट केली होती. असे वागणे महिलांच्या प्रतिष्ठे विरुद्ध आहे.