मुक्ताईनगरचा खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरळीत…

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि.११ जून रोजी अचानक उद्भवलेल्या वादळी वाऱ्यामूळे हरताळा फाट्या जवळील मुख्य विद्युत वाहिनीचे टावर ला वादळाचा फटका बसला होता यात एक टावर पूर्ण पणे कोसळले होते तर दुसरे टॉवर मोडकळीस आलेले होते यामुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील अनेक गावातील बत्ती गुल झाली होती .

आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी घटनस्थळी तातडीने धाव घेत भेट दिली. यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला यानंतर येथील परिस्थिती पाहता व अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत व्हायला किमन २ दिवस लागू शकतात अशी शक्यता वर्तवीले असता, आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलिच राज्याचे उपमुख्य मंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केली. यानंतर स्वतः येथे थांबून आवश्यक यत्रंणा व साहित्य येथे उभे करून स्वतः घटनास्थळी जातीने उपस्थित राहिले यामुळे येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी देखील सकारात्मक प्रयत्न केल्याने अवघ्या काही तासात मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील अनेक भागातील खंडित वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.

यावेळी आमदारांसह मुक्ताईनगर येथील नगरसेवक पियूष मोरे, संतोष(बबलू)कोळी, मुकेश वानखेडे, निलेश शिरसाट यांचेसह शिवसेना पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांनीही मुक्ताईनगर महावितरणचे कार्यकारी अभियंता ब्रिजेशकुमार गुप्ता, उपअभियंता ढोले, तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले व अनिश्चित काळात अंधारात जाणाऱ्या तसेच उन्ह्याळ्यातील प्रचंड गरमीमुळे त्रस्त असलेल्या मुक्ताईनगर वासियांना दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.