सर्वत्र ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा बोलबाला, ‘RRR’ला तगडी टक्कर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘ओम राऊत’ (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurusha) चित्रपटाची तारीख जवळ येउन ठेपली आहे. येत्या १६ जून रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हाच चित्रपट कधीकाळी वादाच्या भोवऱ्यात एकदा नाहीत, दोनदा नाही तब्बल तीन वेळेस सापडला होता. दिग्दर्शक ओम राऊत यांनी सुधारणा करून येत्या १६ जुन रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरविले. बघता बघता ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून शनिवारी रात्रीपासून ॲडव्हान्स तिकिट बुकिंगला सुरुवात झाली. ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला. रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीसमध्ये जवळपास 18 हजार तिकिटं विकली गेली आहेत. तर रविवारी रात्रीपर्यंत हा आकडा जवळपास 23 ते 25 हजारांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.

हजारो तिकिटांची विक्री
पीव्हीआरमध्ये 8800, आयनॉक्समध्ये 6100 तर सिनेपोलीसमध्ये 3500 तिकिटं विकली गेली आहेत. केवळ सहा तासांच्या अंतरात झालेली ही बुकिंग उल्लेखनीय आहे. कारण रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 7800 तिकिटं विकली गेली होती. केवळ प्रेक्षकच नाही तर काही सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाच्या तिकिटांची बुकिंग करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.