पाचोऱ्यात पोलिस उपअधीक्षक धनंजय येरुळे यांची वर्णी, चुकीच्या कामांना माफी नाही- धनंजय येरुळे

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा (Pachora) येथे पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांची सेवानिवृत्ती झाल्याने त्या जागी मुंबई येथील गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे यांची वर्णी लागली आहे. धनंजय येरुळे यांनी पाचोरा, भडगाव येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम केलेले असल्याने त्यांना तालुक्याचा चांगला अभ्यास असल्याने पाचोरा उपविभागीय काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवून अवैध गौण खनिज उत्खनन, अवैध व्यवसाय, वाहन चालकांना शिस्तबद्ध पद्धतीने वाहने चालविणे यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल जेणे करून समाजासमाजात व्हॉट्स ॲप द्वारे मेसेज पसरवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याची गय केली जाणार नाही. अशी माहिती भ्रमणध्वनीद्वारे पोलिस उप अधीक्षक धनंजय येरुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे हे सन – १९८९ मधे एम. पी. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या सेवेची सुरुवात नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात झाली. त्यांनंतर अमरावती, बीड येथील परळी, सिरसाळा पोलीस ठाणे, जालना येथे महामार्ग वाहतूक शाखेत सेवा देत असतांना सहायक पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती, त्यांनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, दौलताबाद, वाळूंज पोलीस ठाण्यात सेवा सन – २०१७ मधे जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, धुळे येथील देवपूर व सन – २०२२ मधे पोलिस उपअधीक्षक पदी प्रमोशन झाल्यानंतर मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता अश्या ठिकाणी यांनी आपले काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.