पालखी सोहळ्यानिमित्त ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांच्या पालखी सॉकल्याचे आयोजन करण्यात आहे व आज शहरात पालखी दाखल होणार आहे. सर्व ठिकाणी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. शहरातील प्रामुळं रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी सिहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. पालखी ज्या ठिकणाहून जाईल तेथील संपूर्ण रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. सोयीनुसार टप्प्याटप्प्याने शहरातील मुख्य रस्ते बंद करण्यात येणार आहे.

तसेच पालखी सोहळ्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून अचूक नियोजन करण्यात आलंय. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील रस्ते बंद करण्यात येतात. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल,तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.