रामानंदनगर परिसरातील तरुणीवर विनयभंग, आरोपीस अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंद परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका गर्ल्स हॉस्टेल मधील तरुणीला वारंवार फोन करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ११ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलिसठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर येथे राहणारी २० वर्षीय तरुणी हि जळगाव शहरातील एक परिसरात गर्ल्स हॉस्टेल मध्ये राहते. तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शनिवारी १० जून रोजी सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान रवींद्र खेडकर याने तरुणीच्या फोने वर कॉल केला. त्यानंतर तिचा दुचाकीने पाठलाग करत विनयभंग केला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तरुणाविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी रवींद्र खेडकर याच्या विरोधात रामानंदनगर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोहेकॉ सुनील पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.