चक्कर येऊन पडल्याने इसमाचा मृत्यू

0

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथून जवळच असलेल्या दगडी येथील ४० वर्षीय इसम मोटार सायकलवर चक्कर येऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.२१ रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली.

दगडी येथील अंकुश मानिक मोरे (वय ४०) साकळी येथे कपडे घेण्यासाठी गेला होता. साकळी येथून मनवेलकडे येताना मनवेल गावाजवळ मोटार सायकल चालवताना  चक्कर येऊन रस्त्यावर खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला.

जगन मोरे, महेंद्र मोरे, सुभाष मोरे, मगन मोरे यांनी साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरीता नेले तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू घोषित केले. मयताच्या पश्चात  आई,  चार भाऊ, पत्नी, मुले असा परीवार आहे. माजी सरपंच जगन मोरे यांचे भाऊ होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.