२१ वर्षीय शिपायाने केला शाळेतील ३ विद्यार्थिनींचा विनयभंग

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. २१ वर्षीय शिपायाने शाळेतील विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिल्याचे उघड झाले आहे. संबंधित विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शालेय विद्यार्थिनींना फोने करून त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलत असे. २ नोव्हेंबर पासून आरपीने विद्यार्थिनीला फोन करण्यास सुरुवात केली. तसेच शाळेच्या परिसरात देखील त्यांच्याबद्दल अश्लील शेरेबाजी करत असे, त्यांचा पीडित मुलींना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला होता. अखेर तिघींनी घडलेला प्रकार पालकांकडे सांगितला.

आरोपीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर रोजी शाळेलट असतांना मुलींवर अश्लील शेरेबाजी केली. या प्रकरणाने मुली घाबरल्या, मात्र त्यांनी याबाबत पालकांना माहिती देण्याचे ठरवले. संबंधित पीडित मुलींच्या पालकांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.