दिवाळी स्पेशल रेसिपी : चकली

0

खाद्यसंस्कृती विशेष

दिवाळी म्हटलं म्हणजे फराळ.. त्यात जर चकली नसली तर तो फराळ कसला.. चटकदार आणि खमंग पदार्थ म्हणून चकली सर्वांनाच आवडते. कुरकुरीत चकली बनवण्यासाठी परफेक्ट भाजणी महत्त्वाची आहे. चला तर चकलीची खास रेसिपी

चकली

साहित्य:

• १ कप चकलीची भाजणी

• १ कप पाणी

• १ टिस्पून हिंग

• २ टिस्पून पांढरे तिळ

• १/२ चमचा ओवा

• १ टेस्पून लाल तिखट

• १ टिस्पून तेल

• चवीपुरते मिठ

कृती:

• १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.

• पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.

• कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.

• चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही.

• सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

 

भाजणीची चकली 

साहित्य

4 मेजरींग कप जाडसर तांदूळ

2 मेजरींग कप चना डाळ

1 मेजरींग कप मुगाची डाळ

1/2 मेजरींग कप उडदाची डाळ

1/2 मेजरींग कप ज्वारी

1/2 मेजरींग कप साबुदाणा

1/2 मेजरींग कप जाडेपोहे

1/2 मेजरींग कप जीरे

1/2 मेजरींग कप धने

4-5 हिरव्या मिरच्या

5-6 लसूण पाकळ्या

2 टीस्पून जीरे

2 टीस्पून तिखट

4-5 टीस्पून तिळ

2 टीस्पून ओवा

1 टीस्पून हळद

चवीनुसार मीठ

कृती :

स्टेप 1

प्रथम तांदूळ स्वस्छ धुऊन कापून कापडावर सुकवून घेतले.सर्व डाळी कापडाने पुसून टाकले.

स्टेप 2

नंतर तांदूळ सर्व डाळी मंद आचेवर भाजून घेतल्या धने, जीरे भाजून घेतले नंतर थंड झाल्यावर भाजणी जीरे धने घालून दळुन आणले.

स्टेप 3

नंतर एका परातीत भाजणी चे पिठ घेऊन त्यात १/२ वाटी तेलाचे मोहन घालून घेतले.

स्टेप 4

नंतर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात तिखट, मीठ हळद, तिळ, ओवा घालून मिक्स करून घेतले थंड झाल्यावर भाजणी पिठात घोळवून पिठ भिजवून घेतले.

स्टेप 5

नंतर कढईत तेल गरम करून साच्याच्या साह्याने चकली पिळून चकल्या खंमग तळून घेतल्या.

स्टेप 6

भाजणीची चकली तयार झाल्यावर सर्व्ह करायला तयार झाली.

 

 

चकली (कणकेची)

साहित्य:

• गव्हाचे पीठ

• तिखट

• मीठ

• हळद

• तीळ व तळणीसाठी तेल

 

कृती:

• गव्हाचे पीठ फडक्यात पुरचुंडी बांधून कुकरमध्ये ठेवून तीन शिटय़ा काढून वाफवून घ्या.

• ती कणीक गार झाल्यावर मोकळी करून त्यात वरील साहित्य घालून चांगले मळा व चकल्या तळा.

• आयत्या वेळेस करता येते. खायला कुरकुरीत होतात.

 

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.