मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर ! वसंत मोरे म्हणाले….

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात (Maharashtra Politics) मोठे नाराजी नाट्य सुरु आहे. इतर पक्षाप्रमाणे आता मनसेमध्येही (MNS) नाराजीचे सूर उमटत असल्याचे चित्र दिसत आहे.

मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More)पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे यांना पुणे (Pune) शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. परंतु त्यांना भाषणच करू दिलं नसल्यामुळे मोरे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या चर्चेमुळे मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पुणे शहरात झालेल्या मनसेच्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना बोलू दिलं नाही. त्यामुळे वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केलीय. वसंत मोरे यांना स्थानिक पदाधिकारी डावलत असल्यामुळे वसंत मोरे यांची नाराजी कायम आहे. पुणे शहरात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद सुरू झाला आहे.

दरम्यान, नाराजीच्या संदर्भात वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे म्हणाले की, मी नाराज नाही तर कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सर्व कोअर कमिटीचे मेंबर आले होते. मी ही त्या स्टेजवर बसलो आहे तर मला बोलू दिलं जाईल, असं कार्यकर्त्यांना वाटलं होतं. परंतु मला बोलायची संधी दिली नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का भाषण नाही केलं? असा प्रश्न विचारला. मी म्हटलं, भाषणाच्या यादीत माझं नावच नाही तर मी कसं भाषण करणार?, असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.