एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

एल. एच. पाटील फाउंडेशन संचलित एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी इयता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे उद्देशाचे सामूहिक वाचन केले.

शिक्षिका अन्वेषा माहेश्वरी यांनी भारतीय राज्यघटनेचे विविध वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. मसुदा समितीची स्थापना, मसुधा समितीने केलेले सखोल विचार, त्यात असणाऱ्या विविध कलमांविषयी विद्यार्थ्याना सविस्तर माहिती दिली. शिक्षिका आशा चौधरी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये त्यात असणाऱ्या विविध तरतुदी, भविष्याचा विचार, जगात भारतीय राज्यघटना कशी श्रेष्ठ आहे. त्यामध्ये होणाऱ्या बदलांविषयी, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटने विषयी सविस्तर माहिती दिली.

भारतीय संविधान दिनाचे निमित्त साधून शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या विदयार्थ्यासाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (Quiz Competition) आयोजित करण्यात आली होती. यात पहिली ते तिसरी, चौथी ते सातवी व आठवी ते दहावी असे तीन गट करण्यात आले होते.

स्पर्धा शाळेतील विविध हाऊसेस ग्लॅडिएटर्स, वॉरियर्स परफॉर्मस रिफॉर्मस या गटांमध्ये घेण्यात आली. इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील एकूण 48 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. पहिली ते तिसरीच्या वयोगटासाठी स्पर्धा झेन यांनी आयोजित केली. चौथी ते सातवीच्या वयोगटासाठी स्वाती जाधव व मोनाली सैंदाणे यांनी प्रश्नमंजुषा आयोजित केली. तर इयता आठवी ते दहावीसाठी दीपक सराफ व श्याम बाजपेयी यांनी मेहनत घेतली. प्रत्येक गटात चार हाऊसेसचे प्रत्येकी 4-4 असे 16 विद्यार्थी सहभागी होते. प्रश्नमंजुषेसाठी परीक्षक म्हणून वीरेंद्र पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर स्पर्धेत जनरल राऊंड, बझर राऊंड, रॅपिड फायर राउंड असे तीन राउंड घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची उत्सुकता, मेहनत, तयारी वाखाणण्याजोगी होती.

इयत्ता पहिली ते चौथी व आठवी ते दहावीच्या वर्गासाठी ग्लॅडिएर्टस हाऊस विजेते ठरले. तर चौथी ते सातवी या वर्गासाठी वॉरियर्स हाऊस मधील विद्यार्थी विजेते ठरले.

सर्व विजेत्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, वैशाली पाटील, मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजाता साळुंखे यांनी अभिनंदन केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व त्यांच्या मेहनतीमुळे विद्यार्थी विजयी झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशाल पवार यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.