बँकेची 1 कोटी 30 लाखांत फसवणूक; गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव (Chalisgaon) शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राची (Bank of Maharashtra) 1 कोटी 30 लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांसह एकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील भालचंद्र पाटील (रा. पंचवटी, नाशिक) यांनी वाहन घेण्यासाठी येथील महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेत बनावट कागदपत्रे खरी भासवून सादर केली. बॅंकेच्या शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी अजय सिंग व प्रोसेसिंग अधिकारी मंदार देशमुख यांनी या कागदपत्रांची खात्री न करता, सुशील पाटील यांना वाहन कर्जासाठी 1 कोटी 30 लाख रुपये मंजूर केले.

दरम्यान बॅंकेला सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर बॅंकेची फसवणूक झाली. बॅंकेतर्फे निशांत इलमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले तपास करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.