जळगावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील रस्त्यांची कामे त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, असा प्रश्न आज महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात आ. सुरेश भोळे यांनी उपस्थित केला.

आज दिनांक : २५ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविणेसाठी रस्ते विकासासाठी भरगोस निधी द्यावा, तसेच या पूर्वी मागणी केलेल्या एकूण १३० कोटी निधीची मागणी मंजूर करण्यात यावी. मागील काळात मंजूर १०० कोटी निधीपैकी उर्वरित ५८ कोटी निधी लवकरात लवकर मिळावा.

त्याचबरोबर जळगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी शहरात नवीन एमआयडीसी  टाऊनशिप करिता मंजुरी द्यावी. जळगाव शहरातील महत्वाच्या समस्या सोडविणे बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत बैठक आयोजित करावी, असा प्रश्न उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.