राज्यात थंडीचा कडाका, या भागात पावसाची शक्यता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून  विविध भागातील तापमानात मोठी घट झाल्याने राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबई पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानातही मोठी घसरण पहायला मिळत आहे. या कडाक्याची थंडीत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात घट झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. हीच परिस्थिती पुढील दोन ते तीन राहण्याची शक्यता आहे. तर काही भागात प्रचंड धुक्याची चादर सुद्धा पसरली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 72 तास पुण्यात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 24 जानेवारीच्या पहाटेपर्यंत शहरात धुके कायम राहण्याची शक्यता आहे. तर 27 जानेवारीपर्यंत, शहराचे किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. मुंबई शहर आणि उपनगरात थंडी वाढली आहे. मुंबईत 16.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस मुंबईत रात्री आणि दुपारी थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 पावसाची शक्यता

राज्यातील काही भागांमध्ये 23, 24 तारखेला किरकोळ पावसाची शक्यता आहे. यात पूर्व विदर्भाच्या काही भागाचा समावेश आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.