व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आणणार फाईल शेअरिंग ‘हे’ अपडेट !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या अब्जावधी युजरसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सातत्याने नवनवीन पिक्चर लॉन्च करत असतो आता आपल्या युजर्सला मोठ्या फाईल सोप्या पद्धतीने शेअर करता याव्यात यासाठी कंपनी एका नवीन फीचर वर काम करत आहे. पूर्वीप्रमाणेच ब्लूटूथने फाईल शेअर करत होतो. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅप वरून समोरच्या व्यक्तीला फाईल्स पाठवता येणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप आल्यापासून एकमेकांना फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्स पाठवणं अगदी सोयीस्कर झाला आहे. मात्र यावर सध्या ठराविक मर्यादेपर्यंत साईजच्या फाईन पाठवता येतात. सोबतच यासाठी डेटा ही खर्च होतो. मात्र नवीन पिक्चरमुळे या अडचणी दूर होणार आहेत. WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.

फाइल्स पाठवण्यास मदत
या नव्या पिक्चरमुळे तुम्हाला शेजारी असणाऱ्या व्यक्तीसोबत फाईल शेअर करता येते. “शेअर टू पीपल नियरबाय” असं या फीचर्स नाव असणार आहे. याच्या माध्यमातून यूजर्स 2GB एवढ्या साईजच्या फाइल्स देखील शेअर करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.