प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने Youtube वर प्रथापित केला नवा विक्रम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येतील भव्य राम मंदिरात सोमवारी ऐतिहासिक असा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जगभरातील कोट्यावधी श्रीराम भक्तांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाला. सुरक्षेच्या कारणास्तव या सोहळ्याला अयोध्येत सामान्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र टीव्ही युट्युब आणि ओटीटीच्या माध्यमातून कोट्यावधी भाविकांनी हा सोहळा लाईव्ह बघितला.

Youtube वर या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग चा नवीन विक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चैनल वरील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा या व्हिडिओने यूट्यूबच्या इतिहासात सर्वाधिक लाईव्ह स्ट्रीम व्हीवरशिप मिळविली. 19 मिलियन लोकांनी या चैनल वर हा सोहळा लाईव्ह पाहिला.

नरेंद्र मोदींच्या अधिकृत youtube चैनल वरून या सगळ्यांचे दोन व्हिडिओ ब्रोडकास्ट करण्यात आले होते. यातील एका व्हिडिओला दहा मिलियन लोकांनी पाहिलं तर दुसऱ्या व्हिडिओला नऊ मिलियन लोकांनी पाहिला. केवळ एका व्हिडिओच्या माध्यमातूनच youtube वर एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. या व्हिडिओने चांद्रयान-३ लँडिंग, फिफा वर्ल्ड कप सामने या सर्व लाईव्ह व्हिडिओला मागे टाकला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.