संभाजीनगर येथे तहसिल कार्यालयातील ३ जणांचा अपघात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑफिसचे काम संपवून सिल्लोडला निघालेल्या शासकीय वाहनाचा झालेल्या अपघातात तहसील कार्यालयातील दिघी कर्मचारी जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली. या घटनेतील जखमी झालेल्या लोकांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर सिल्लोड मार्गावर केरळा फाटा जवळील पेट्रोल पंप समोर हा अपघात झाला. तहसील कार्यालयाचे वाहन एका उभ्या असलेल्या वाहतुकीच्या वाहनास धडकले यामध्ये तिघेही जण जखमी झाले आहे.

या तिघांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वाहन चालक कयूम देशमुख, कोतवाल राजीव बसेय्या, आणि वसीम शेख अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहे. आपले कार्यालयीन कामकाज संपवून हे सिल्लोड कडे येत होते. त्या दरम्यान उभे असलेल्या वाहनास पाठीमागून त्यांच्या वाहनाने जोरदार धडक दिली. जीपच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झालेला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.