सोने-चांदीच्या दरात मोठा बदल ; पहा आजचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून  काल अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते, या पावन दिवशी अनेकांनी सोने चांदीची देखील मोठी खरेदी केली.

रविवारी आणि सोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. सोमवारी सराफा बाजाराच्या महासंघाने सुट्टी जाहीर केल्याने भाव जाहीर झाले नाहीत. आज मंगळवारी सोने आणि चांदीच्या वायदे दरांमध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वाढीसह व्यवहार होत आहे. सोन्याचे फेब्रुवारी वायदे (फ्युचर्स) MCX वर ७३ रुपये किंवा ०.१२ टक्क्यांची किरकोळ घट नोंदवून ६१,९४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावले. ५ फेब्रुवारी रोजी डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याच्या फ्युचर्सचे मागील बंद ६१,८६८ रुपये होते. त्याचप्रमाणे दरम्यान, चांदीच्या मार्च फ्युचर्समध्ये ३४ रुपयांची किंवा ०.०५% घसरण झाली आणि MCX वर ७०,८१६ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ७०,८५० रुपये प्रति किलोवर आले.

जळगाव सुवर्णनगरीतील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर ६२,२४० रुपये आहेत तर चांदीचे भाव ७१, ०१० रुपयांवर व्यवहार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.