लाकडाच्या वखारीला भीषण आग, २ जणांचा होरपळून मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिपरी-चिंचवडमधल्या वाल्हेकरवाडी येथे ही घटना घडली आहे. मध्यरात्री अडीज वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ललित अर्जुन चौधरी (वय २१) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आधी लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे ही आग आणि धूर ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेडमध्ये गेला. त्या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेल्या दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध झाल्या. आगीत पोटमळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला आहे.

आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू

परिसरात रहिवासी सगळे असताना अचानक आग लागली. गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली. आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी बादलीच्या साह्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याच प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं. आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.