सायबर अटॅक होणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे. त्याच वेगाने सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. जगभरातील सायबर गुन्हेगार भारताला आपलं लक्ष्य करत आहेत. आशिया-पॅसिफिक प्रांतामध्ये सर्वाधिक सायबर अटॅक झालेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक असल्याचं एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

सायबर सिक्युरिटी फर्म असणाऱ्या चेक पॉईंटने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. आशिया-पॅसिफिक भागात तैवान या देशावर २०२३ साली सर्वाधिक सायबर हल्ले झाले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत देश होता. २०२२ च्या तुलनेत भारतावर २०२३ मध्ये १५ टक्के अधिक सायबर हल्ले झाल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणत्या क्षेत्रात किती हल्ले ?

२०२३ देशातील वर्षात भारतातील प्रत्येक संस्थेवर दर आठवड्याला सरासरी २,१३८ सायबर हल्ले झाले. २०२२ च्या तुलनेत ही संख्या १५ टक्क्यांनी अधिक होती. तैवानमधील ही संख्या आठवड्याला ३,०५० हल्ले एवढी होती. भारतातील शिक्षण क्षेत्राची संबंधित संस्थांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले. अर्थात, २०२२ च्या तुलनेत यामध्ये १२ टक्क्यांनी घट दिसून आली आहे. त्यानंतर रिटेल आणि होलसेल सेक्टरवरील हल्ल्यांमध्ये २२ टक्के वाढ झाली. त्यामुळे हे सेक्टर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हेल्थकेअर सेक्टरवरील हल्ल्यात देखील तीन टक्क्यांची वाढ दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.