शेंदुर्णीत श्रीराम मंदिर प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रचंड शोभायात्रा

0

शेंदुर्णी ता.जामनेर ;- अयोध्येत आज प्रभु रामरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे यानिमित्ताने शेंदुर्णीत भव्य शोभायात्रेने सगळ्यांच्या प्रचंड सहभागाने मोठा उत्साह होता.यानिमित्ताने प्राचीन श्रीराम मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी आकर्षक दिपोत्सव साजरा करण्यात आला.
सकाळी श्रीराम मंदिरात श्रीपाद विसपुते यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड व जिल्हा परिषद सदस्या सौ.सरोजिनी गरुड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

सकाळी श्रीराम मंदिरापासुन भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला. अग्रभागी अश्व,ढोलपथक, झांजपथक, दुर्गावाहीनीच्या युवतींचे ढोलपथक, भजनी मंडळे,विविध समाज बांधवांच्या सहभागाने प्रभु रामरायाच्या प्रतिकृती, सजीव दृश्ये, विविध संत महंतांचे कट आऊट,विविध मंडळांचा, समाज बांधव तसेच अवघी शेंदुर्णीत आज सर्वत्र रामरायाच्या नामघोषात दंग झाली होती. कलशधारी महिला, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे तसेच मोठ्या प्रमाणात हिंदु बांधव सहभागी झाले होते. शनिश्वेर महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या नंतर ही सगळ्यात मोठी शोभायात्रा निघाली आहे असे जाणकार सांगत आहे.

सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिरात समरसता आरती करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.श्रीरामाच्या पालखीचे भाविक दर्शन घेत होते. Simply ठिकाणी प्रभु रामरायाचे भव्य फोटो, प्रत्येक घरावर भगवा ध्वज,आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.दुपारी श्रीराम मंदिर परिसरात तसेच शहरातील विविध भागात प्रसादाचे वितरण करण्यात आले.

प्राचीन श्रीराम मंदिर आकर्षक फुलांनी, विद्युत रोषणाई तसेच संध्याकाळच्या दिपोत्सवाने छान सजविण्यात आले होते.रात्री श्रीराम मंदिर परिसरात सामुदायिक रामरक्षा,हनुमान चालीसा व श्री. गजानन महाराज यांची बावन्नीचा सोहळा रंगला होता.शेंदुर्णीतील सगळीच मंदिरे सजविण्यात आले होते.जागोजागी मोठ्या पडद्यावर अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा भाविक बघत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.