ऑक्टोपसच्या चार नवीन प्रजातींचा शोध

0

सॅन जोस कोस्टा रिका;- शास्त्रज्ञांनी समुद्राखाली एक अतिशय महत्त्वाचा शोध लावला आहे. येथे समुद्राच्या खोलीत वाळू चाळत असताना, शास्त्रज्ञांना अर्ध्या पारदर्शक अंड्यातून एक लहान ऑक्टोपस बाहेर येताना दिसला. शास्त्रज्ञांनी या ऑक्टोपसविषयी संशोधन केले, तेव्हा शास्त्रज्ञांना ती ऑक्टोपसची यापूर्वी कधीही न दिसलेली पूर्णपणे नवीन प्रजाती असल्याचे आढळून आले. त्याला सध्या ‘डोराडो ऑक्टोपस’ असे नाव देण्यात आले आहे.

शास्त्रज्ञांना येथे आणखी तीन नवीन ऑक्टोपस प्रजाती सापडल्या आहेत. म्हणजे शास्त्रज्ञांच्या पथकाने एकूण चार नवीन ऑक्टोपस प्रजाती शोधल्या आहेत. या सर्व प्रजाती खोल समुद्रातील आहेत. कोस्टा रिकामध्ये शंभर चौरस मैल आकाराच्या परिसरात हे ऑक्टोपस सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय विज्ञान संघाच्या शास्त्रज्ञांचे पथक २०२३ च्या दोन मोहिमांचा भाग म्हणून सीमाउंट्सचा शोध घेत असताना या नवीन प्रजाती त्यांनी शोधल्या आहेत. पहिली मोहीम जूनमध्ये राबवण्यात आली होती, ज्यात दोन ऑक्टोपस नर्सरी हायड्रोथर्मल स्प्रिंगमध्ये सापडल्या होत्या. तर सहा महिन्यांनंतर, शास्त्रज्ञ त्याच नर्सरीमध्ये परत आले तेव्हा त्यांना ते सर्व सक्रिय असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना त्या हायड्रोथर्मल स्प्रिंगपासून दूर असलेल्या अनेक नवीन ऑक्टोपसच्या प्रजाती सापडल्या,

 

या शोधावरून खोल समुद्रात ऑक्टोपसच्या अजूनही अनेक प्रजाती लपलेल्या असण्याची शक्यता आहे. अद्याप त्यांच्याविषयी कोणालाही माहिती नाही. तसेच त्यांच्याविषयी अद्याप कोणत्याही नोंदी झालेल्या नाहीत. त्यामुळे समुद्रात असलेल्या प्राण्यांच्या विविधतेबद्दल आणखी बरेच काही शिकण्यास मदत होणार आहे. महासागराच्या खोलवर किती प्रमाणात जीवसृष्टी अस्तित्वात आहे? याचा अचूक अंदाज आतापर्यंत शास्त्रज्ञांनाही लावता आलेला नाही. त्यामुळे वैज्ञानिक संशोधन अतिशय मनोरंजक बनले असून यात काहीही रहस्यमय गोष्टी प्रकाशात येऊ शकतात. दरम्यान, शास्त्रज्ञांना सापडलेल्या नवीन ऑक्टोपस प्रजातींमुळे, मनोरंजक सागरी प्राण्यांची संख्या देखील वाढली आहे. यावरून समुद्राच्या पाण्यात अजूनही बरेच काही दडले असण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.