ठाकरेंना पुन्हा धक्का ! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सत्तासंघर्षानंतर अजूनही राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. उद्धव ठाकरेंना एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदेनी ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. मात्र ही यादी रद्द करण्याची मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यात आता सत्तांतर झालं आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांवर आता नवी नावं आपण देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे.

त्यामुळे नावांची जुनी यादी रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावं सुचवणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.