अल्पवयीन मोलकरणीला मारहाण; दाम्पत्यावर गुन्हा

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दाम्पत्याने अल्पवयीन मोलकरणीला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारे नरेश आठवाणी यांनी घरकामासाठी नाशिक येथून एका अल्पवयीन मुलीस आणले होते. गेल्या दोन वर्षापासून ही मुलगी त्यांच्या घरचे काम करत होती. तिने अलीकडेच आपल्या आई- वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आठवाणी यांच्यासह त्यांची पत्नी राधा यांनी तिला नकार देत अमानुष मारहाण केली. यामुळे त्या मुलीने घरातून पळ काढला.

दरम्यान पोलिसांनी या मुलीची विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नरेश आठवाणी आणि राधा आठवाणी (रा. सिंधी कॉलनी) यांच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक हरीश भोये हे करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.