पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ बाईक रॅली

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पोळ्याच्या दिवशी झालेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलीसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करीत आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी सोमवार २९ ऑगस्ट रोजी खामगाव बंदचे आवाहन केले होते. तर बंद दरम्यान विना परवानगी बाईक रॅली काढून पोलीस स्टेशनसमोर पोलीस प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केली. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी आ. आकाश फुंडकर सह ५८ जणांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहे. तर रॅलीतील संख्या पाहता आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील फरशी भागात शिवाजी नगर पोलीस स्टेशनसमोर दरवर्षीप्रमाणे २६ ऑगस्ट रोजी पोळा भरविण्यात आला होता. सायंकाळी पोळा फुटल्यानंतर बैलाची लाथ लागल्याचे कारणावरुन विशिष्ट समाजातील युवकांनी वाद घातल्याने दगडफेकीची घटना घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीसांनी दोन्ही गटातील सुमारे ७० जणांविरुध्द दंगलीचे गुन्हे दाखल करुन काहींना अटक केली. मात्र सदर कारवाई करतांना पोलीसांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप आ. आकाश फुंडकर यांनी केला व रविवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेवून पोलीस प्रशासनाने दडपशाही केली असून या निषेधार्थ २९ ऑगस्ट सोमवार रोजी खामगांव शहर बंदचे आवाहन केले होते.

तर बंद दरम्यान विना परवानगी बाईक रॅली काढली व शिवाजीनगर आणि शहर पोलीस स्टेशनसमोर पोलीसांच्या विरोधात नारेबाजी केली तसेच गांधी चौकातील रॅली समारोप प्रसंगी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांना पोलीसांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या सभेत अनुपस्थित राहण्याचेही आवाहन केले होते. याप्रकरणी पोहेकॉ गजानन सातव यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन आ. आकाश फुंडकरसह ५८ जणांविरुध्द भांदवी कलम १८८, १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

खरी गोम काय?

आ. फुंडकर यांनी शहरातील ३ पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्याची मागणी केली आहे. तर बाईक रॅलीत सहभागी अवैध धंदेवाईक पाहता आ. फुंडकर यांच्या मागणी मागील खरी गोम काय? अशी चर्चा शहरातील सुज्ञ नागरीक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.