समाजकार्याला समर्पित नीलकंठ बजाज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नीलकंठ वासुदेव  बजाज यांचा 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. नीलकंठ बजाज यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. समाजात अनेकांना त्यांनी मार्गदर्शन करून यशस्वी बनवले. त्यांनी केलेले अगाध समाजकार्य आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. साधे राहणीमान, कुठलाही बडेजाव नाही, अगदी साधे जीवनमान, सर्वांना मदत करणारा स्वभाव, कुणीही कुठलीही समस्या घेऊन आलं तर ती समस्या सुटलीच पाहिजे असे हे व्यक्तिमत्व. सर्वांमध्ये मिळून मिसळून घेणारा स्वभाव, प्रचंड जनसंपर्क असलेले हे नीलकंठ बजाज. जणू काही त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजकार्यासाठी वाहून दिलेलं. वयाच्या 75 वर्षीसुद्धा अत्यंत चिरतरुण व्यक्तिमत्व. त्यांनी केलेल्या समाजकार्याची विविध स्तरातून दाखल घेत त्यांना अनेक मोठ्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आले.

नीलकंठ वासुदेव  बजाज यांचा 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे औक्षण करून 75 दिव्यांनी ओवाळण्यात आले. 75 नाण्यांनी तयार केलेला सुंदर हार व फुलांचे हार  घातले. श्री व सौ बजाज यांना स्टेजवर स्थानापन्न करण्यात आले. यावेळी फुलांच्या पायघड्या करण्यात आल्या. त्यांच्या भोवती सदाबहार संघाच्या स्वागत समितीने महिलांनी फेर धरून ‘सुदिनम’ हे गाणे व ‘बार बार ये दिन आये’ हे गाणे टिपऱ्या खेळून अभिष्टचिंतन केले. मंत्र चार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. नीलकंठ बजाज यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी काही पुरस्कार दाखवण्यात आले. बजाज यांनी शैक्षणिक सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेली सेवा कार्य दाखविण्यात आले. बजाज यांनी विविध संस्था मध्ये केलेले कार्य अनेकांना व्हिडिओ फिल्म बघितल्यानंतर कळले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

वाढदिवस प्रसंगी  बजाज परिवारातील सदस्य, चिवास प्रगती प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष दीपक वाणी, उपाध्यक्ष जयप्रकाश यावलकर, सचिव धीरज पाटील, कार्यकारिणी सदस्य, संस्थापक अध्यक्ष डी एस गडे, डॉ. विजय वाणी, श्याम मुरलीधर कौशिक, एस के वाणी, संजय गडे,  शरद अटरावलकर, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यासह श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या निकेतन प्रशालाचे प्राचार्य संजय पंडित गजऋषी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, रावेर परिसर मित्र मंडळातील मान्यवर, मित्र परिवार, तळेगाव ढमढेरे जेसीस क्लबचे सदस्य, बावधन विकास समितीतील सदस्य, सक्षम जेष्ठत्व पुणे या संस्थेचे अध्यक्ष व सदस्य, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी, अध्यक्ष मधुकरराव पवार, दिलीपराव पवार, विजय कुमार शेठ, प्राचार्य पद्माकर पुंडे, श्रीराम बेडकिहाळ, विश्व शक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे सदस्य, बावधन जेष्ठ नागरिक संघ सदस्य, सदाबहार सीनियर्स संघ पदाधिकारी व सदस्य व वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

नीलकंठ बाजाज यांना उदंड आयुष्य लाभावे, सुख समृद्धी वृद्धिंगत व्हावी, शांती समाधान लाभावे यासाठी त्यांच्यावर 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

नीलकंठ वासुदेव बजाज यांनी खालील संस्थांची स्थापना करून विविध पदावर जबाबदारी स्वीकारून कार्य केले. 

1) संस्थापक कार्यकारणी सदस्य- रावेर परिसर मित्र मंडळाची पुणे येथे स्थापना केली 1978.

2) श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे येथे शिक्षण संस्था स्थापन केली 1984.

3) संस्थापक अध्यक्ष – श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ 1984 ते 1998

4) विद्यानिकेतन प्रशाला हे हायस्कूल कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे जून 1984 पासून सुरु केले.

5) प्राचार्य विद्यानिकेतन प्रशाला कोंढापुरी तालुका शिरूर, जिल्हा पुणे. 1994 ते 1998

6) अध्यक्ष- तळेगाव ढमढेरे जेसीज क्लब 1985.

7) संस्थापक अध्यक्ष- सद्गुरु हाउसिंग सोसायटी तळेगाव ढमढेरे, जिल्हा पुणे. 1986.

8) संस्थापक अध्यक्ष- बावधन ज्येष्ठ नागरिक संघ बावधन पुणे 21. 3 जानेवारी 2009 ते 3 जानेवारी 2019

10) अध्यक्ष- बावधन सुरक्षा समिती 2013.

11) संस्थापक कार्याध्यक्ष- सक्षम ज्येष्ठत्व, पुणे. 2013 ते 2016.

13) संस्थापक कार्याध्यक्ष- पाटील नगर बावधन विकास समिती. 2014 ते 2017

14) संस्थापक कार्यकारणी सदस्य- बावधन इंडस्ट्रियल असोसिएशन 2016.

15) प्रकल्प प्रमुख- सक्षम ज्येष्ठत्व पुणे व ससून हॉस्पिटल पुणे रुग्णसेवा मार्गदर्शन 2014 ते 2016.

16) प्रकल्प प्रमुख- सक्षम ज्येष्ठत्व पुणे व शिवतेज नर्सिंग ब्युरो बावधन 2016.

17) उपसचिव दक्षिण विभाग व सहल प्रमुख मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ ( Ascop) 2014 ते 2017.

18) मोहल्ला कमिटी सदस्य-  कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, पुणे. 2014 ते 2018.

19) सदस्य- पोलीस आयुक्त ज्येष्ठ नागरिक कक्ष केंद्रीय समिती पुणे, हिंजवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलीस कमिशनर कार्यालयाकडून 23 नोव्हेंबर 2017.

20) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशन 2017 ते 2020.

21) संस्थापक कार्यकारिणी सदस्य कोथरूड महासंघ 2018.

22) सहकोषाध्यक्ष एस्कॉप कार्यकारिणी. 2019 ते 2024.

23) संपर्क समिती सदस्य ज्येष्ठ प्रज्योत एस्कॉप वर्गणी जमा करणे.

24) कोथरूड गटप्रमुख अध्यक्ष मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना पुणे एस्कॉप पुणे दिनांक 5.6.2022.

25) संस्थापक अध्यक्ष- सदाबहार सिनियर्स संघ बावधन पुणे 21. 2019.

—————————————-

श्री नीलकंठ बजाज यांना मिळालेले विविध पुरस्कार व सत्कार

1) जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे श्री किसन भाऊ भुजबळ यांच्या हस्ते सत्कार व शुभाशीर्वाद 1985.

2) विधानसभा अध्यक्ष माननीय खासदार अण्णा जोशी यांच्या हस्ते सत्कार व शुभाशीर्वाद 1988.

3) सुलझर इंडिया, कोंढापुरी तालुका शिरूर- अध्यक्ष श्री जोशी साहेब यांच्या हस्ते सत्कार व शाळेला देणगी 1995.

4) शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे श्री मोहन रानडे यांच्या हस्ते सत्कार. 1994.

5) 2010 बावधन मर्चंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडून सत्कार व सन्मानचिन्ह.

6) 2011 राष्ट्र सेवा प्रतिष्ठान पुणे. नोकरी महोत्सव यांच्याकडून सत्कार व सन्मानचिन्ह.

7) 2011 श्रीराम उद्योग समूह, बावधन यांच्याकडून सत्कार व सन्मानचिन्ह.

8) 2011 सोबती ज्येष्ठ नागरिक संघ पुणे यांच्याकडून गौरव व सन्मानचिन्ह.

9) 2011 रावेर परिसर मित्र मंडळ यांच्याकडून सत्कार व स्मृतिचिन्ह

10) 2013 खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार

11) बावधन मंच यांच्याकडून सत्कार व Outstanding Achievement Certificate of Recognition

12) 2014 मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना (Ascop) पुणे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ सत्कार व सन्मान चिन्ह.

13) 2014 भारतीय जनता पार्टी बावधन शाखेकडून बावधनचे नाव ऊंचावलया बद्दल सन्मानचिन्ह व सत्कार.

14) 2014 माननीय किरण दगडे व बावधन ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विद्यमाने गौरव व सन्मानचिन्ह.

15) 2014 ताकुबाईची वाडी तालुका फलटण जिल्हा सातारा हे दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेतले त्याबद्दल तेथील सरपंचांचे हस्ते व बीडिओ यांच्या हस्ते सत्कार व गौरव.

16) 2014. लायन्स क्लब Dist 323 D2 यांच्याकडून सन्मानचिन्ह व सत्कार.

17) 2014 भाजप प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते समाजकार्याबददल सत्कार व सन्मानचिन्ह

18) 2014 सुभाष विदया मंदिर तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथिल माजी विद्यार्थ्यांकडून मानपत्र व सत्कार.

19) 2014 पुणे विदयापीठाकडून बावधन ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्मरणीकेस दवितीय क्रमांकाचे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

20) 2014 सूर्यदत्ता इन्स्टिटयूट बावधन यांच्याकडून सत्कार व सन्मानचिन्ह.

21) 2014 माननीय किरण दगडे पाटील मित्र परिवाराकडून सत्कार व स्मृतिचिन्ह

22) 2014 सुप्रसिदध कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते सत्कार

23) 2014 अपर्णाताई रामतीर्थकर धार समाजसेविका यांचे हस्ते सत्कार

24) 2015 पर्वती कृती नागरी समिती पुणे यांच्याकडून उत्कृष्ट जेष्ठ नागरिक संघ सन्मान चिन्ह व सत्कार

25) 2015 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचेकडून गौरव व स्मृतिचिन्ह

26) 2015 माननीय किरण दगडे पाटील मित्र परिवार दहीहंडी महोत्सव यांचेकडून स्मृतिचिन्ह श्रीकृष्णाची मूर्ती व सत्कार.

27) 2015 चितोडे वाणी समाज जळगाव. जागतिक महासंमेलन जळगाव येथे सत्कार व सन्मानचिन्ह.

28) 2015 राष्ट्रीय मानव अधिकार संगठन राष्ट्र भूषण 2015 सन्मान व पुरस्कार

29) 2015 क्रीडा महर्षी माननीय हेमत जोग यांच्या हस्ते सत्कार

30) 2015 पी आय डोळस साहेब बावधन पोलीस चौकी यांच्याहस्ते ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्कार

31) 2015 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री तेजनिवळीकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात सत्कार

32) 2015 The branch of Human Rights and Manavadhikar field Social Work Vidya Vachaspati.

33) 2016 15 ऑगस्ट 2016 पुणे महानगरपालिकेकडून पुणे शहराच्या कीर्तीत भर घातल्याबद्दल सन्मानचिन्ह व सत्कार

34) 2016 चितोड वाणी समाज भुसावळ, चिवास महिला मंडळ भुसावळ, चिवास युवा मंच भुसावळ परिसर यांच्याकडून सामाजिक कार्यासाठी स्मृतिचिन्ह व पुरस्कार.

35) 2016 भारतीय जनता पार्टी बावधन शाखा यांच्याकडून सत्कार व सन्मान चिन्ह

36) 2016 माननीय राज ठाकरे यांचे हस्ते ज्येष्ठ नागरिकासाठी विरंगुळा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी सत्कार व सन्मान

37) 2016 डॉक्टर न. म. जोशी यांच्या हस्ते सत्कार

38) 2017 विश्वशक्ती इंटरनेशनल फाउंडेशन संस्थेकडून बेस्ट चेअरमन अवार्ड 2017 सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, श्रीफळ व शाल देऊन गौरविण्यात आले.

39) 2017 डॉक्टर देशपांडे हॉस्पिटल यांच्याकडून सरकार व सन्मानचिन्ह 19. 7. 2017

40) 2017 विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती व सत्कार 1 मे 2017 ते 1 मे 2020 पर्यंत.

41) 2017 पूर्ण विद्यापीठाकडून संघाच्या हरिद्वार स्मरणीकेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 6000/- रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

42) 2017 विश्वशक्ती इंटरनेशनल फाउंडेशन संस्थेकडून स्वामी विवेकानंद कृतज्ञता पत्र व सन्मान

43) 2018 चितोडे वाणी समाज प्रगती प्रतिष्ठान, पुणे यांच्याकडून सन्मान व सत्कार

44) 2018 सामाजिक न्याय विभाग (महाराष्ट्र शासन) आमदार मेधाताई कुलकर्णी व एस्कॉप पुणे यांच्या संयुक्त विद्यमान जेष्ठस्तव 2018- दिनांक 1 ऑक्टोबर 2018 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित माननीय मंत्री महोदय श्री बडाले सामाजिक न्याय विभाग यांच्या हस्ते सत्कार व स्मृतिचिन्ह

45) 2018 कोथरुड महासंघाची स्थापना व वेबसाइटचे उद्घाटन प्रसंगी कार्यकारिणीत निवड व सत्कार

46) 2018 डॉक्टर विद्यासागर विष्णु महाराज पारनेरकर याच्या हस्ते सामाजिक कार्यासाठी पुष्पगुच्छ मोत्याचा हार व शुभ आशीर्वाद 7 ऑक्टोबर 2018

47) 2019 जागतिक महिला दिनानिमित डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून गौरविण्यात येऊन सामाजिक कार्यासाठी सत्कार करण्यात आला. 8 मार्च 2019

48) 2019 पुणे येथे तळेगाव ढमढेरे येथील माजी विद्यार्थी मेळावा व पुस्तक प्रकाशन, लेखक डॉक्टर नंदकुमार शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सत्कार करण्यात आला. 26 मे 2019

49) 2019 मध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना एस्कॉप पुणे आयोजित ज्येष्ठ शिक्षक संमेलन  28 सप्टेंबर 2019 रोजी ज्येष्ठ शिक्षक सन्मान मोमेन्टो देऊन सन्मानित करण्यात आले.

50) 2020 मानधन ज्येष्ठ नागरिक संघाकडून बावधन ज्येष्ठ नागरिक संघाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल व संघासाठी दिलेल्या योगदानासाठी सन्मानपूर्वक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  11-1-2020

51) 2020. चितोडे वाणी समाज प्रगती प्रतिष्ठान, पुणे यांच्याकडून सामाजिक कार्यासाठी पुष्पगुच्छ व भगवद्गीता ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. 26 जानेवारी 2020.

52) 2020. कै. रवींद्र पवार प्रतिष्ठान व सोबती ज्येष्ठ नागरिक संघ यांनी सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ज्येष्ठ नागरिक गौरव पुरस्कार देऊन श्रीफळ, मोत्याचा हार, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. 22-2-2020.

53) 2020 15 ऑगस्ट 2020. रोजी मुळशीकर जनसेवा फाउंडेशन यांनी आपण आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजसेवेला ही हातभार लावला आहे, त्यासाठी गौरवपत्र देऊन सन्मान केला.

54) 2020 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनानिमित शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी सदाबहार सिनियर्स संघाने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

55) 2022 ऊर्जा पुरस्कार- गौरव सोहळा सन्मानचिन्ह” विविध सामाजिक क्षेत्रात तसेच समाजातील गोरगरीब जनतेसाठी नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल माननीय सौ. अमृता ताई फडणवीस यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. दिनांक 16. 4. 22

56) 1984 तळेगाव ढमढेर जेसीज कडून सन्मानचिन्ह व सत्कार.

Leave A Reply

Your email address will not be published.