Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हृदयद्रावक ; चिमुकल्या मुलीला गळफास देऊन पित्याने केली आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    हृदयद्रावक ; चिमुकल्या मुलीला गळफास देऊन पित्याने केली आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 21, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर ;- राहत्या घरीच एका सहा वर्षांच्या चिमुकलीलागळफास देऊन निर्दयी पित्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूरच्या मोतीनगर भागात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून निर्दयी पित्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने लातूर जिल्हा हादरून गेला . सायंकाळी साडेसहा वाजता दोघांच्याही पार्थिवांवर मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

    लातूरच्या मोतीनगर भागात अभय लक्ष्मीनिवास भुतडा (३६) यांचे ‘राम-काशी’ हे निवासस्थान आहे. भुतडा यांचे मोतीनगर भागातील कोरे गार्डनसमोरील रस्त्यावर इडली सेंटर होते. भुतडा यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. यामुळे त्यांची आर्थिक चणचण सुरू होती. यातून नैराश्य आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. या नैराश्यातूनच अभय भुतडा हे बुधवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ईडलीच्या दुकानातून घरी जाऊन येतो, असे कामगारांना सांगून घराकडे गेले होते. घरी गेल्यानंतर भुतडा यांनी स्वतःच्या सहा वर्षांच्या नव्या अभय भुतडा या चिमुकलीला घरातच दोरीच्या सहाय्याने फासावर लटकवले. त्या वेळी तिचा जीव गेल्याचे लक्षात आल्यानंतर अभय भुतडा यांनीही स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

    त्या वेळी त्याची पत्नी ही जवळच असलेल्या तिच्या वडिलांकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेली ही घटना पोलिसांना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास समजली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. असलेले दिसून आले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह खाली उतरवून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उत्तरीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दोघांच्याही पार्थिवांवर मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

    या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गोविंद पांडुरंग मुंदडा यांच्या फिर्यादीवरून मयत आरोपी अभय लक्ष्मीनिवास भुतडा याच्याविरोधात चिमुकली नौव्या अभय भुतडा हिचा खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गांधी चौक पोलीस ठाण्याचे सपोनि. अशोक उजगरे हे करीत आहेत.

    #atmhatya #crime #murder Latur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif