ब्रेकिंग ! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

0

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठवाड्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली आहे.

आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकजण घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे.  यापूर्वी देखील मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली आहे. त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.